Wednesday, April 29, 2009

मुसळधार पावसात गारा वेचताना

मुसळधार पावसात गारा वेचताना
तुझ्याच आठवणी येत होत्या
आणि जेव्हा भानावर आलो
तेव्हा गाराही वितळल्या होत्या

:- अजय कोरपे

आयुष्याच्या एका वळणावर

आयुष्याच्या एका वळणावर
जेव्हा तुझी माझी भेट झाली
मला असे वाटले माझ्या
सात जन्माची कोडी सुटली

:- अजय कोरपे

Tuesday, April 28, 2009

मन

"मन"

माणसांची पाच ज्ञानेंद्रिये कोणती हा दुसरी नाहीतर तिसरीतला हमखास प्रश्न. त्यामुळे आई बाबा पाठीवर चपलांचे, पट्ट्यांचे किंवा झाडूचे रट्टे देऊन ह्या प्रश्नाचे उत्तर चांगलेच रटुन घ्यायचे. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही माणसांची पाच ज्ञानेंद्रिये. डोळ्यानी चांगल्या गोष्टी कोणत्या आणि वाईट गोष्टी कोणत्या याचा प्रथम दर्शी पडताळा होतो. कान वाईट आणि चांगल्या गोष्टी जसा राजहंस दूध आणि पाणी वेगळे करतो अशाच प्रकारे वाईट आणि चांगल्या गोष्टी वेगळे करतात.तशाच प्रकारे जीभ "चव", नाक "गंध" आणि त्वचा "स्पर्श" ज्ञान देते.

पण जशी जशी इयत्ता वाढत जाते तशी तशी ही ज्ञानेंद्रिये ही विकसित होत जातात. आणि त्यांची व्यक्‍तिगत परिमाणे पण बदलत जातात. काहीना सुंदर वाटणारे देखाव्यांच इतराना सोयर-सुतक पण नसत. काही मेथीचे लाडू चवीने खातात तर काही त्याच्या आजुबाजूला पण फिरकत नाहीत. असे का होते? कधी केलाय का याचा विचार? नाही ना? वाटलच होतो? कारण असा काही लिहीण्यापूर्वी मीही कधी विचार केला नव्हता... हे हे हे .. :) शाळेमधे फक्त पाचच् ज्ञानेंद्रिये शिकवली होती पाच पांडवांसारखी. पांडव जसे सहा होते तशीच ही ज्ञानेंद्रिये पण सहाच आहेत. आणि कर्णाप्रमाणे नेहमीच उपेक्षित राहिलेल सहाव इँद्रीय म्हणजे "मन".

मन हे मानवाच एक अदृश्य अंग आहे. ज्याचा खरा ठावठिकाणा अजुन विज्ञानाला पण नाही लागला आहे. हेच माणसाच ब्रम्हांग आहे. ज्याच्यामुळे आपण प्रत्येक गोष्टींची तुलना करतो, चांगल काय वाईट काय याची मीमांसा करतो आणि आयुष्यात काही योग्य - अयोग्य निर्णय घेतो. हे मन म्हणजे एखाद्या रिमोट कंट्रोल सारखे आहे ( रिमोट कंट्रोल साठी मराठी शब्द माहीत नाही आहे, आपणास माहीत असल्यास सुचवावे. धन्यवाद). जर आपला मनावर ताबा नसेल तर आपण मनातल्या हातातला रिमोट कंट्रोल होऊ आणि आपला मनावर ताबा असेल तर आयुष्यातला प्रत्येक चित्रपट आपल्या आवडीचा असेल.

हे मन खूप चंचल असते, कधी या तर कधी त्या फुलावर बसणार्‍या भुंग्यासारखे असते. जर वेळीच ते नियंत्रणा खाली नाही आणले की तुमचा मनावरचा ताबा सुटतो आणि युध्धात उध्वस्त झालेल्या विमानाप्रमाणे तुम्ही आयुष्यात हेलकावे खाउ लागतात.आणि तशा स्तिथीत जस विमानवर ताबा मिळवणे कठीण होऊन जाते तशीच अवस्था मग अस्थिर मनाला स्थिर करताना होते.

तुम्ही घाबरून जाउ नका, कधी कधी हेच हेलकावे खाणारे विमान तुम्हाला जगाच्या एका टोका पासून दुसर्‍या टोका पर्यंत सेकॅंडाच्या एक शतांश वेळेमधे पोहचवू शकते. असा तुफान वेग असतो मनाचा. संभाळून हां...नाहीतर अपघात व्हायचा..:) असा वेग अजुन सूर्याच्या किरणांना पण गाठता आला नाही आहे कारण रात्री नंतर पहाटे पहाटे पहिल्या सूर्या किरणानी भुमी न्हाहून निघायला तब्बल काही तासांचा अवधी लागतो. पण मनाच काय तुम्ही आता ठरवल की रात्र होते आणि तुम्ही ठरवल की दिवस पण !!!!

तुमच सगळ आयुष्य तुमच्या मनावर अवलंबुन असत. समजा वाळवंटाच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत निघालेल्या दोन प्रवाश्यांपैकी एक मनाने खूप दुर्बळ आहे. वारंवार फसवणार्‍या म्रुगजळामुळे खूप हताश झालेला आहे आणि दुसरा त्या म्रुगजळाचा पाठलाग करून सुद्धा हरला नाही आहे. सहाजिकच पहिला प्रवासी वाटेतच दगावणार. कारण हे नाही आहे की तो शरिराने थकला होता की त्याला पुरेसे पाणी मिळाले नाही. कारण हे आहे की त्याच्या मनाने प्रतिकूल परिस्तिथित पराभव स्वीकारला होता.मात्र दुसरा प्रवासी भर वादळात सुद्धा वाळवंटाच्या दुसर्‍या टोकाला पोहोचतो आणि तेही पाण्याचा एक थेंब ही न पिता.

उत्तर तुमच्या समोर आहे.तुम्हीच आता विचार करा ???? तुमच्या बेंभान, मोकाट सुटलेल्या मनाला तुमच्या अधिपत्याखाली आणा.तुम्ही मनाच्या अधिपत्याखाली जाउ नका नाही तर तुमच परिपत्य नक्की आहे.

Monday, April 27, 2009

"Alchemist" :- Paulo Coelho

  1. Failure is nothing more than learning how to win.
  2. In dreams begins responsibilities.
  3. Manage by Mind and Lead by Heart...
  4. It is not because things are difficult that we do not dare; it is because we do not dare that they are difficult.
  5. Promise keeping, aggressive listening, being consistently compassionate and finally and perhaps most importantly truth telling :- Secrets to the incredible relationship
  6. Every time you avoid doing right, you fuel the habit of doing wrong.
  7. Listening to what others have to say is mark of respect.
  8. *** One of the greatest gift you can ever give anyone is giving them 100% of your attention.
    "Listening truely is the highest compliment."
  9. Stop listening with the intent to respond, instead listen with the intent to understand.
  10. Small actions can have big consequences.
  11. Time slips through our hands like grains of sand, never to return again. Have the courage to embrace and enjoy life as you travel through it.
  12. The person who tries to do everything achieves nothing. so the real secret to getting things done is knowing what things need to remain undone.
  13. As you live your days, so you live your life.
  14. The tougher you are on yourself, the easier life will be on you.
  15. The greatest battle we fight take place within ourselve.

Inspirational thought from "Like the flowing river"

Be like the flowing river,
Silent in the night.
Be not afraid of the dark.
If there are stars in the sky, reflect them back.
If there are clouds in the sky,
Remember, clouds like the river, are water,
So, gladly reflect them too,
In your own tranquil depths.
:- Manuel Bandeira

आता मला लागले

आता मला लागले
परतीचे वेड
कधी होईल मित्रांशी
माझी भरतभेट
:- अजय कोरपे

गाने बहूत गाये थे हमने आपकी फर्माईश मे

गाने बहूत गाये थे हमने आपकी फर्माईश मे
हसे बहूत थे तुम्हे हसाने के लिये
हसके अलविदा करेंगे ए दोस्त तुझे
रोयेंगे उसके बाद तुम्हे भुलाने के लिये
:- अजय कोरपे

Sunday, April 26, 2009

Some quotes from "Mind-Your-Mind" :- By Remez Sasson

  • In order to make changes in our life, we have to make changes in our thinking process.
    One single thought is not strong enough to make a change; but if the same thought is repeated, it gradually gains strength. A thought that is often repeated takes roots in the subconscious mind and from there it affects our lives and even our environment.

    The great thing about this process is that we don’t need to strain or overexert ourselves to make it happen. All we have to do is to choose a thought that we want to come true and repeatating it.
  • When your thoughts, feelings and moods become steady and under your control, your life also becomes under your control. You become the deciding factor not outside influences or passing moods.
  • Your thoughts and feelings can draw or repel success. They shape your belief and expectations about success or failure.
    Thoughts too often come and go and change direction like the wind. They influence your mind the same way that the wind affects the direction of a flag. One moment the flag may be fluttering this way and moment later in a different direction. One moment you might be thinking in this way and moment later in a different way.
  • Concentration and Will-Power
    In order to make control your thoughts, feelings and moods, concentrations and will-power need to be developed. Concentration and will power constitute the steering wheel of your life, with which you can navigate the boat of your life towards success and achievement.
  • It is important to learn to be more positive, less critical and less worried. Then when success is achieved, you can enjoy the happiness of realization.


त्वरित निर्णयाचे महत्व.

त्वरित निर्णयाचे महत्व.
निर्णय घेता न येणे यासारखा दुसरा दोष नाही. निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय घेणे हे अधिक बरे. एकवेळ चुकीचा निर्णय घेणार्‍या माणसानी जीवनात यश मिळवले आहे. परंतु जो निर्णयच् घेऊ शकत नाही, ज्यांचे मन नेहमी "हे" की "ते" या गोंधाळात गुरफटलेले असते, असा मनुष्य मात्र कधीच यशस्वी झाल्याचे ऐकलेले नाही आणि ज्याला कृती करता येत नाही त्याला कोणत्याच क्षेत्रात यश मिळवता येत नाही.
:- Unknown Author

पाशणालाही ह्रदय असतं

पाशणालाही ह्रदय असतं
तर, तेही कळवळल असतं
ठेच लागल्यावर
नाहीतर चटका नक्की
लागला असता
गरम रक्त सांडल्यावर
:- अजय कोरपे

किती फरक पडतो ना माणसांत

किती फरक पडतो ना माणसांत
लहानपणि खेळणी तूटल्यावर रडनार पोर
मोठेपणी स्वप्ने तूटल्यावर सुध्धा
हसत हसत वावरत

:- अजय कोरपे

कावळा आणि कावळीचा बर

कावळा आणि कावळीचा बर
एकच रंग असतो
आपली कोणती आणि दुसर्‍याची
हाच तर खरा खेळ असतो
:- अजय कोरपे

तू आल्यापासून सध्या

तू आल्यापासून सध्या
स्वप्नांच्या दुनियेत वावरतोय
खोट का बोलाव तुझ्याशी...
वेड्यांसारख मधेच खुदकन हसतोय
:- अजय कोरपे

कधी कधी हा एकटेपणा

कधी कधी हा एकटेपणा
खूप काही सांगून जातो
जस काळ्या गर्द अंधाराला
मिणमिणता दिवा निरोप सांगून जातो

:- अजय कोरपे

मला तुझ्या मनातल

मला तुझ्या मनातल
सगळ काही ऐकायच आहे
त्यासाठी तुला मला
एकांतात गाठायाच आहे... :
- अजय कोरपे

माझ्या चारोळ्या लोकांना

माझ्या चारोळ्या लोकांना
नेहमीच अर्धवट वाटायच्या
खर तर त्यांचा शेवट
मला कधीच नाही जमायचा
:- अजय कोरपे

पाठलाग

असाच कित्येक वेळ
विचार करत बसतो
मनातल्या विचारांचा
पाठलाग करू लागतो

पाठलाग करून मात्र
काहीच हाती लागत नाही
जिथून सुरवात केली
तेथेच येऊन थांबतो
:- अजय कोरपे

तुझी आठवण

असे का व्हावे? की
मावळतीचा सूर्य पहिल्यावर
तुझीच आठवण यावी.....

तुझ्या गालावरची लाली
तांबड्या सूर्याला चढावी

मग ती सूर्यकीरणे
तांबट केसांसारखी भासावी

अंगावर अलगद पडू लागताच
उभी कांती शाहरूण जावी

:- अजय कोरपे

मैत्री ही गुलाबाच्या

मैत्री ही गुलाबाच्या
काट्यासारखी असते
त्यांची कितीही निर्भत्सना केली
तरी फुलाला तेच सांभाळत असते

:- अजय कोरपे

माझ्याही भावनांचा चिखल झाला होता

माझ्याही भावनांचा चिखल झाला होता
तुझ्यापासून दूर जाताना
मलाही काय? कल्पना होती, दुष्काळ
पडणार होतो, मी परत येताना.....
:- अजय कोरपे

नाही ऐकला तुझा आवाज की

नाही ऐकला तुझा आवाज की
उमळलेल्या कळ्या अलगद गळून पडायच्या
कधी चुकुन स्वप्नी आलीस की
कोमेजलेल्या कळ्या मग छान खुलायच्या
:- अजय कोरपे

तुझ्या सुंदर डोळ्यांतुनी

तुझ्या सुंदर डोळ्यांतुनी
दिसे उमेद उद्याची
नाही पहिले क्षणभरही
दिसे संध्याकाळ शेवटची
:- अजय कोरपे

मी एकटा - चारोळी संग्रह

तुझ्या गालावरची खळी
मनाचा एकटेपणा घालवतात
नाही ऐकला तुझा आवाज
तर मनाचा पाझर आटावतात
:- अजय कोरपे

तुझ्या दबक्या पावलाचा मागोवा

तुझ्या दबक्या पावलाचा मागोवा
वेड मन घेत असत
तू कायम माझ्या सोबत आहेस
असाच भास करून देत असत

:- अजय कोरपे

बस एक दुखन सोडून

बस एक दुखन सोडून
सगळ काही घेऊन गेलीस
कोण किती विव्हळ्त आहे
न पुसता निघून गेलीस

: - अजय कोरपे

एकाएकी जुन्या आठवणींनी

एकाएकी जुन्या आठवणींनी
मनात कालवा केला,
एका क्षणात निर्जीव कातळ
मग कसा काय विरघळला ?
: - अजय कोरपे

हळूच तुझे नाजूक शब्द

हळूच तुझे नाजूक शब्द
कानावर माझ्या पडले
मागे वळून पाहिले तेव्हा
गुलाबाचे फूल छान हसले
:- अजय कोरपे

न बोलून सुद्धा माझ्या भावना

न बोलून सुद्धा माझ्या भावना
न कळण्याएवढी तू भोळकट नव्हतीस
तुझ्या प्रेमाच्या चक्रव्यूहात
माझी अभिमन्यूची भूमिका होती
:- अजय कोरपे

काही शब्दच अपुरे पडत होते

काही शब्दच अपुरे पडत होते
भावना व्यक्त करण्यासाठी
तुझा हात हाती घेऊन
समुद्रा काठी फिरण्यासाठी

: - अजय कोरपे

चमचमत चांदण पाहील की

चमचमत चांदण पाहील की
मन एकदम दाटून येत
तूने दाखवलेल्या चांदणीकडे
मग एकटक पाहत बसत
:- अजय कोरपे

Saturday, April 25, 2009

कोणी मला विचारले

कोणी मला विचारले
कसा करतोस तू चारोळी
मी ही सांगेन त्याना
प्रेम करून बघ एकदा स्वतःशी
:- अजय कोरपे

तुझ्यविणा एकटे राहायला

तुझ्यविणा एकटे राहायला
आता मी शिकून गेलो होतो
खर तर तू जवळ असतानाच
याचीच रंगीत-तालीम मी करत होतो
:-अजय कोरपे

काही प्रश्नांची उत्तरे

काही प्रश्नांची उत्तरे ही
न मिळालेलीच चांगली असतात
कारण अशा प्रश्नाची उत्तरे
प्रश्न अधिक चिघल करतात
:- अजय कोरपे

पिल्लांच्या पोटासाठी

पिल्लांच्या पोटासाठी
चिमना घरट्याबाहेर पडला
त्यांची पोट तर भरली
पण त्यांच्या चिवचिवाटाला मुकला

:- अजय कोरपे

तू दूर जाताना सुद्धा तुझी सावली

तू दूर जाताना सुद्धा तुझी सावली
तुझी राहिली नव्हती
नाहीतर माझ बोट सोडून, ती नक्की
तुझ्या सोबत आली असती
:- अजय कोरपे

आज कुठे चार शब्द लिहावेसे वाटले

आज कुठे चार शब्द लिहावेसे वाटले
चार शब्द लिहिताना मन ही थोडे दाटले
माझ्या चार शब्दात तू नव्हती मावत
उरलेले शब्द मग डोळ्यातून होते ओघळत
:- अजय कोरपे

तुला कस सांगू

तुला कस सांगू
त्रास मलाही खूप होतो
तुला बाहू-पाशात पहिल्यावर
फास मला का बसतो?
:- अजय कोरपे

अपेक्शांचे ओझे वाहताना

अपेक्शांचे ओझे वाहताना
माणसांच्या इच्छा मरण पावतात
अशाच माणसांची का? पुढे
मेल्यानंतर भूत बनतात...
:- अजय कोरपे

कोमेजलेल्या फुलाकडे

कोमेजलेल्या फुलाकडे
फुलपाखरू फिरकत नव्हते
मला वाटले कदाचित
तेही माणसाळलेले होते
:- अजय कोरपे

कधी कधी मुर्खानाही

कधी कधी मुर्खानाही
शहाणपण द्याव लागत
आपल शहाणपण टिकवण्यासाठी
थोड मूर्ख बनाव लागत....
:- अजय कोरपे

कधी कधी खूप उंचावरून

कधी कधी खूप उंचावरून
पडण्याची भीती वाटत नाही
मनातल्या विचारांच्या खोलीपुढे
ती उंची काहीच वाटत नाही
:- अजय कोरपे

मलाही एकदा खूप

मलाही एकदा खूप
उंचावरून पडायचा आहे
थोडा वेळ का होईना..?
पण हवेत तरंगायच आहे ....
:- अजय कोरपे

त्या घोंघवणार्‍या वार्‍याचा

त्या घोंघवणार्‍या वार्‍याचा
मला खूप राग आला होता
तुझ्या मोकळ्या केसाना पाहून
तोही वेडा-पीसा झाला होता
:- अजय कोरपे

तुझ्या पैंजनांचा आवाज

तुझ्या पैंजनांचा आवाज ढगांच्या गडगडाटात ऐकला
तुझ्या केसांची झुळुक तुफानी वादळात अनुभवली
तूच असशील म्हणून पुढे जेव्हा गेलो
पुन्हा मला "खो" देऊन नवा डाव देऊन गेलिस
: -अजय कोरपे

Friday, April 24, 2009

आसवाने डबडबलेल्या पापण्यांत

आसवाने डबडबलेल्या पापण्यांत
तुझ्याच आठवणी होत्या
शेवटचा थेंब जेव्हा पाझरला
तेव्हा तुझा अधिकारही मावळला

:- अजय कोरपे

शेवटची चार पावले

शेवटची चार पावले
हातात हात देऊन चालशील का?
तू कायमची आठवणीत राहशील
असे काही क्षण देशील का?
:- अजय कोरपे

ती संध्याकाळ

ती संध्याकाळ खूपच छान होती
जेव्हा तू माझ्या घट्ट मिठीत होतीस
आपण दोघे मिठीत असे कायमचे अडकावे
तुला मला पाहून मग काजव्यानीही खूप जळावे

:- अजय कोरपे

आयुष्य

खूप सोप असत आयुष्य
आपणच गुंता करून ठेवतो
उठल्या बसल्या नुसत
नशिबाला दोष देत बसतो १

जन्मा-मरणा मधली सरळ रेष
म्हणजे असते आयुष्य
आपणच वेडी वाकडी वळणे घेत
अंतर वाढवून ठेवतो २

झर्‍यासारख खळखळत राहण
म्हणजे असते आयुष्य
आपणच डबक्यासारख थांबून
चिखल करून ठेवतो ३

आकाशाहून विशाल मन
म्हणजे असते आयुष्य
आपणच चार भिंतीत राहून
मने संकुचित करतो ४

दिव्यात जळणार्‍या ज्योतीएवढ
उबदार असते आयुष्य
आपणच त्यात तेल ओतून
वणवा पेटवून देतो ५

हातातला घास दुसर्‍यांना देणे
म्हणजे असते आयुष्य
आपणच घास हिरावून घेऊन
मने दुखवून बसतो ६

चन्दनापरी झिजने
म्हणजे असते आयुष्य
हसता हसवता अश्रू लपविणे
म्हणजे असते आयुष्य ७
:- अजय कोरपे