Friday, May 29, 2009

काही क्षणात झालेली मैत्री

काही क्षणात झालेली मैत्री
शेवट पर्यंत टिकते, अस ऐकलय
म्हणून आपल्या मैत्रीची
मी परीक्षा घ्यायची ठरवलय
:-अजय कोरपे

Monday, May 25, 2009

माझ्या आयुष्यात येणारी परी

माझ्या आयुष्यात येणारी परी
खरच कशी हो असेल?
माझ्या इवल्याशा साम्राज्याची
खरच का सम्राज्ञी ती शोभेल?

नाकी डोळी रेखीव असेल की
मनानेही तेवढीच सुंदर असेल?
माझ्या इवल्याशा घरट्याला का
आपल मानणारी असेल?

शृंगार करणारी असेल की
कंबरपण कसणारी असेल?
संसाराच्या गाड्याला ती का
अखंड साथ देणारी असेल?

खूप बडबड करणारी असेल का
माझही कधी ऐकून घेणारी असेल?
मी लपविलेल्या अश्रूना का
पदरात पाडून घेणारी असेल?

असे खुळे प्रश्न सध्या
काळ्या आकृतींना विचारतोय
मित्रसुद्धा चेष्टेने विचारतात
"मधेच कोणाशी बोलतोय?"

काय सांगू त्याना मी
तुझीच वाट पाहतोय
जिला कधीच पहिले नाही
तिच्यावर जीवपाड प्रेम करतोय

:- अजय कोरपे

Sunday, May 24, 2009

इतरांसारखी मला सुद्धा पावसात

इतरांसारखी मला सुद्धा पावसात
भिजण्याची खूप आवड आहे
त्याच दिवशी वर्षभराच सगळ रडून
घेण्याची माझी जगावेगळी सवय आहे
:- अजय कोरपे

Sunday, May 17, 2009

Nice Quotes - 1

Overdose of anything leads 2 DEPRESSION & then KILLS U, b it love, trust or
EXPECTATIONS.....


The inevitable truth of life: " Every1 in ur life is going 2 hurt u sooner or later" U just have 2 realise who is worth?? The Pain or the Person??

A Person is alwaz "used".....it depends whether u r using some1 or u r being used by some1.....

Monday, May 11, 2009

आपण दोघे माळेमधले अगदी

आपण दोघे माळेमधले अगदी
आजु-बाजूचे मणी होतो
कधी नीट निरखून पहिलेस का?
दोघेही परस्पर भिन्न टोकावर होतो
:-अजय कोरपे

आयुष्यात भेटणार्‍या सर्वच जणांना

आयुष्यात भेटणार्‍या सर्वच जणांना
मित्र म्हणून मानता येत नसत
संकटाच्या वेळी जे साथ सोडत नसतात
त्याना कधीच विसरता पण येत नसत
:- अजय कोरपे

माणसानी खरच कधीतरी

माणसानी खरच कधीतरी
दुसर्‍यांसाठी जगल पाहिजे
सूर्या एवढ जरी जमल नसल
ज्योती एवढ तरी जळल पाहिजे
:- अजय कोरपे

मीही आजकाल थोडा उपाशी

मीही आजकाल थोडा उपाशी
राहण्याचा प्रयत्न करतोय
माझ्या ताटातील एक घास
दुसर्‍यांसाठी बाजूला करतोय
:- अजय कोरपे

माझ्या विरुद्ध वाहणार्‍या वार्‍याची

माझ्या विरुद्ध वाहणार्‍या वार्‍याची
मला खूप चीड आली होती
नंतर माझे मलाच उमजले की
दिशा तर मीच बदलली होती ना ! ! !
:- अजय कोरपे

Sunday, May 10, 2009

कातरवेळ आणि समुद्रकिनारा

कातरवेळी समुद्राकाठी मला
सुंदर कविता सुचली
हाती पेन पेन्सिल नसल्याने
वाळुतच ती मी लिहिली

अशी कविता क्वचितच
कोणी केली असावी
जी वाचण्यासाठी सुर्यानेही
मावळतिची वेळ वाढवली

जे जे काही मनात होते
ते सर्व काही वाळूत कोरले
मनातल्या भावनांचे कोठार
काही क्षणात रिकामे झाले

सुंदर अशी कलाकृती
त्या वाळूत साकार झाली
ढगात लपलेल्या चंद्राची
मग उत्कंठा शिगेला पोहचली

आजूबाजूचे सर्व काही
त्या कवितेत तल्लीन झाले
त्याना जोडीला लाटेचे
छान पार्श्व-संगीत लाभले

काही क्षणात सागराला
तुफान भरती येणार होती
अभय दिलेल्या शब्दाना आता
जीवंत समाधी मिळणार होती

लाटेंच्या तडाख्यात प्रत्येक
शब्द धारतीर्थी पडला होता
फेसाळलेल्या लाटांत मी
शब्द जोडू लागलो होतो

अजूनही ते शब्द जोडण्यासाठी रोज
कातरवेळी समुद्राकाठी जातो
पुन्हा नवीन कविता रचून
तिला वाळूत पुरून येतो
:-अजय कोरपे

Thursday, May 7, 2009

वाटल, उभी असशील वाट पाहत

वाटल, उभी असशील वाट पाहत
तू माझी पुढच्या वळणावर
मीही वळणे घेत राहिलो
सोडूनि सगळ सरणावर
:- अजय कोरपे

प्रेमाची गाडी

माझ्या स्वप्नांवर तिचा
जागता पहारा असतो
तिच्या नजरेचा वेध
माझ्या ह्रदयावर असतो

असं वाटत आता
सुटतील तिच्या नजरेतून शब्द
आणि करतील सार विश्व
एका क्षणात स्तब्ध

डोळे बंद करून तिच्या
मनात शिरण्याचा यत्न करतो
पून्हा अयशस्वी प्रयत्न माझा
नेहमी प्रमाणे फसतो

थेट तिच्या मनाची वाट
कधीच नाही सापडली
माझी प्रेमाची गाडी
पून्हा एकदा घसरली
:- अजय कोरपे

Wednesday, May 6, 2009

तू दूर गेलीस म्हणून मी

तू दूर गेलीस म्हणून मी
आसवे गाळत बसणार नाही
एक लाट ओसरली म्हणून
दुसरी यायची थांबणार नाही
:- अजय कोरपे

Monday, May 4, 2009

जस पाणी घेऊन निघालेले ढग

जस पाणी घेऊन निघालेले ढग
कधीच वाळवंटापर्यंत पोहचत नाहीत
तसच मी पाठवलेले निरोप
कधीच तिच्या पर्यंत पोहचत नाहीत
:- अजय कोरपे

आकाशाला गवसणी घालण्याच धाडस

आकाशाला गवसणी घालण्याच धाडस
आयफेल टॉवरने सुद्धा दाखवल
त्याच्या सर्वोच्च्य टोकाहून सुद्धा
आभाळ आहे तेवढच दूर वाटल.....
:- अजय कोरपे