आशेचा दिपस्तंभ कधी, नेहमीच खात्रीचा वटवृक्ष
कोणाबध्दल बोलतोय मी? तुम्हीच कोड्यात पडलात
बोट धरून चालायला शिकवले..त्यालाच कसे विसरलात
चिमटा लकढून पोटाला, तुमच्या मुखी घास भरले
झुकले नाही कधी परिस्तिथिला, स्वाभिमानात जगले
स्वत:च्या इच्छा-स्वप्नांना शेवटी जिवंतपनी पेटवले
अंगणात वाढणार्या रोपट्यांना तळ्हातावर जपले
सुखी संसारासाठी ते क्षणाला काही तरी कमावत होते
तेव्हाच कधीही परत न येणारे क्षण ते गमावत होते
अंगणातल्या कळ्यांनीच त्यांच्या कष्टाचे चीज होणार होते
उमळलेली काळी पाहून एखादं स्वप्न पूर्ण होणार हॉट
कुठेतरी मनाच्या कोपर्यात त्यानाही एकटेपणा वाटत होता
खूप दूर जाताना त्यांच्याही पापण्या दाटत होत्या
फरक एवढाच होता की, त्यांच्या पापण्या ओलसर नव्हत्या
याचा अर्थ असा नव्हे की त्यांच्या मनात भावना नव्हत्या
:-अजय कोरपे