तू दूर जाताना सुद्धा तुझी सावली
तुझी राहिली नव्हती
नाहीतर माझ बोट सोडून, ती नक्की
तुझ्या सोबत आली असती
:- अजय कोरपे
Saturday, April 25, 2009
तू दूर जाताना सुद्धा तुझी सावली
आज कुठे चार शब्द लिहावेसे वाटले
आज कुठे चार शब्द लिहावेसे वाटले
चार शब्द लिहिताना मन ही थोडे दाटले
माझ्या चार शब्दात तू नव्हती मावत
उरलेले शब्द मग डोळ्यातून होते ओघळत
चार शब्द लिहिताना मन ही थोडे दाटले
माझ्या चार शब्दात तू नव्हती मावत
उरलेले शब्द मग डोळ्यातून होते ओघळत
:- अजय कोरपे
तुला कस सांगू
तुला कस सांगू
त्रास मलाही खूप होतो
तुला बाहू-पाशात पहिल्यावर
फास मला का बसतो?
त्रास मलाही खूप होतो
तुला बाहू-पाशात पहिल्यावर
फास मला का बसतो?
:- अजय कोरपे
अपेक्शांचे ओझे वाहताना
अपेक्शांचे ओझे वाहताना
माणसांच्या इच्छा मरण पावतात
अशाच माणसांची का? पुढे
मेल्यानंतर भूत बनतात...
माणसांच्या इच्छा मरण पावतात
अशाच माणसांची का? पुढे
मेल्यानंतर भूत बनतात...
:- अजय कोरपे
कोमेजलेल्या फुलाकडे
कोमेजलेल्या फुलाकडे
फुलपाखरू फिरकत नव्हते
मला वाटले कदाचित
तेही माणसाळलेले होते
फुलपाखरू फिरकत नव्हते
मला वाटले कदाचित
तेही माणसाळलेले होते
:- अजय कोरपे
कधी कधी मुर्खानाही
कधी कधी मुर्खानाही
शहाणपण द्याव लागत
आपल शहाणपण टिकवण्यासाठी
थोड मूर्ख बनाव लागत....
:- अजय कोरपे
शहाणपण द्याव लागत
आपल शहाणपण टिकवण्यासाठी
थोड मूर्ख बनाव लागत....
:- अजय कोरपे
कधी कधी खूप उंचावरून
कधी कधी खूप उंचावरून
पडण्याची भीती वाटत नाही
मनातल्या विचारांच्या खोलीपुढे
ती उंची काहीच वाटत नाही
पडण्याची भीती वाटत नाही
मनातल्या विचारांच्या खोलीपुढे
ती उंची काहीच वाटत नाही
:- अजय कोरपे
Subscribe to:
Posts (Atom)