Saturday, April 25, 2009

मलाही एकदा खूप

मलाही एकदा खूप
उंचावरून पडायचा आहे
थोडा वेळ का होईना..?
पण हवेत तरंगायच आहे ....
:- अजय कोरपे

त्या घोंघवणार्‍या वार्‍याचा

त्या घोंघवणार्‍या वार्‍याचा
मला खूप राग आला होता
तुझ्या मोकळ्या केसाना पाहून
तोही वेडा-पीसा झाला होता
:- अजय कोरपे

तुझ्या पैंजनांचा आवाज

तुझ्या पैंजनांचा आवाज ढगांच्या गडगडाटात ऐकला
तुझ्या केसांची झुळुक तुफानी वादळात अनुभवली
तूच असशील म्हणून पुढे जेव्हा गेलो
पुन्हा मला "खो" देऊन नवा डाव देऊन गेलिस
: -अजय कोरपे

Friday, April 24, 2009

आसवाने डबडबलेल्या पापण्यांत

आसवाने डबडबलेल्या पापण्यांत
तुझ्याच आठवणी होत्या
शेवटचा थेंब जेव्हा पाझरला
तेव्हा तुझा अधिकारही मावळला

:- अजय कोरपे

शेवटची चार पावले

शेवटची चार पावले
हातात हात देऊन चालशील का?
तू कायमची आठवणीत राहशील
असे काही क्षण देशील का?
:- अजय कोरपे

ती संध्याकाळ

ती संध्याकाळ खूपच छान होती
जेव्हा तू माझ्या घट्ट मिठीत होतीस
आपण दोघे मिठीत असे कायमचे अडकावे
तुला मला पाहून मग काजव्यानीही खूप जळावे

:- अजय कोरपे

आयुष्य

खूप सोप असत आयुष्य
आपणच गुंता करून ठेवतो
उठल्या बसल्या नुसत
नशिबाला दोष देत बसतो १

जन्मा-मरणा मधली सरळ रेष
म्हणजे असते आयुष्य
आपणच वेडी वाकडी वळणे घेत
अंतर वाढवून ठेवतो २

झर्‍यासारख खळखळत राहण
म्हणजे असते आयुष्य
आपणच डबक्यासारख थांबून
चिखल करून ठेवतो ३

आकाशाहून विशाल मन
म्हणजे असते आयुष्य
आपणच चार भिंतीत राहून
मने संकुचित करतो ४

दिव्यात जळणार्‍या ज्योतीएवढ
उबदार असते आयुष्य
आपणच त्यात तेल ओतून
वणवा पेटवून देतो ५

हातातला घास दुसर्‍यांना देणे
म्हणजे असते आयुष्य
आपणच घास हिरावून घेऊन
मने दुखवून बसतो ६

चन्दनापरी झिजने
म्हणजे असते आयुष्य
हसता हसवता अश्रू लपविणे
म्हणजे असते आयुष्य ७
:- अजय कोरपे