खूप सोप असत आयुष्य
आपणच गुंता करून ठेवतो
उठल्या बसल्या नुसत
नशिबाला दोष देत बसतो १
जन्मा-मरणा मधली सरळ रेष
म्हणजे असते आयुष्य
आपणच वेडी वाकडी वळणे घेत
अंतर वाढवून ठेवतो २
झर्यासारख खळखळत राहण
म्हणजे असते आयुष्य
आपणच डबक्यासारख थांबून
चिखल करून ठेवतो ३
आकाशाहून विशाल मन
म्हणजे असते आयुष्य
आपणच चार भिंतीत राहून
मने संकुचित करतो ४
दिव्यात जळणार्या ज्योतीएवढ
उबदार असते आयुष्य
आपणच त्यात तेल ओतून
वणवा पेटवून देतो ५
हातातला घास दुसर्यांना देणे
म्हणजे असते आयुष्य
आपणच घास हिरावून घेऊन
मने दुखवून बसतो ६
चन्दनापरी झिजने
म्हणजे असते आयुष्य
हसता हसवता अश्रू लपविणे
म्हणजे असते आयुष्य ७
:- अजय कोरपे
3 comments:
omg.. its amazing yar..
खूपच आवडली
किती विचार करतोस रे...
some food for thought huh!!! makes one really think what's life all about..
loved it....
Mitra!!!! ekdam sahi re....... 2 gud
झकास कविता!
Post a Comment