मुसळधार पावसात गारा वेचताना
तुझ्याच आठवणी येत होत्या
आणि जेव्हा भानावर आलो
तेव्हा गाराही वितळल्या होत्या
:- अजय कोरपे
मुसळधार पावसात गारा वेचताना
तुझ्याच आठवणी येत होत्या
आणि जेव्हा भानावर आलो
तेव्हा गाराही वितळल्या होत्या
:- अजय कोरपे
आयुष्याच्या एका वळणावर
जेव्हा तुझी माझी भेट झाली
मला असे वाटले माझ्या
सात जन्माची कोडी सुटली
:- अजय कोरपे
माणसांची पाच ज्ञानेंद्रिये कोणती हा दुसरी नाहीतर तिसरीतला हमखास प्रश्न. त्यामुळे आई बाबा पाठीवर चपलांचे, पट्ट्यांचे किंवा झाडूचे रट्टे देऊन ह्या प्रश्नाचे उत्तर चांगलेच रटुन घ्यायचे. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही माणसांची पाच ज्ञानेंद्रिये. डोळ्यानी चांगल्या गोष्टी कोणत्या आणि वाईट गोष्टी कोणत्या याचा प्रथम दर्शी पडताळा होतो. कान वाईट आणि चांगल्या गोष्टी जसा राजहंस दूध आणि पाणी वेगळे करतो अशाच प्रकारे वाईट आणि चांगल्या गोष्टी वेगळे करतात.तशाच प्रकारे जीभ "चव", नाक "गंध" आणि त्वचा "स्पर्श" ज्ञान देते.
पण जशी जशी इयत्ता वाढत जाते तशी तशी ही ज्ञानेंद्रिये ही विकसित होत जातात. आणि त्यांची व्यक्तिगत परिमाणे पण बदलत जातात. काहीना सुंदर वाटणारे देखाव्यांच इतराना सोयर-सुतक पण नसत. काही मेथीचे लाडू चवीने खातात तर काही त्याच्या आजुबाजूला पण फिरकत नाहीत. असे का होते? कधी केलाय का याचा विचार? नाही ना? वाटलच होतो? कारण असा काही लिहीण्यापूर्वी मीही कधी विचार केला नव्हता... हे हे हे .. :) शाळेमधे फक्त पाचच् ज्ञानेंद्रिये शिकवली होती पाच पांडवांसारखी. पांडव जसे सहा होते तशीच ही ज्ञानेंद्रिये पण सहाच आहेत. आणि कर्णाप्रमाणे नेहमीच उपेक्षित राहिलेल सहाव इँद्रीय म्हणजे "मन".
मन हे मानवाच एक अदृश्य अंग आहे. ज्याचा खरा ठावठिकाणा अजुन विज्ञानाला पण नाही लागला आहे. हेच माणसाच ब्रम्हांग आहे. ज्याच्यामुळे आपण प्रत्येक गोष्टींची तुलना करतो, चांगल काय वाईट काय याची मीमांसा करतो आणि आयुष्यात काही योग्य - अयोग्य निर्णय घेतो. हे मन म्हणजे एखाद्या रिमोट कंट्रोल सारखे आहे ( रिमोट कंट्रोल साठी मराठी शब्द माहीत नाही आहे, आपणास माहीत असल्यास सुचवावे. धन्यवाद). जर आपला मनावर ताबा नसेल तर आपण मनातल्या हातातला रिमोट कंट्रोल होऊ आणि आपला मनावर ताबा असेल तर आयुष्यातला प्रत्येक चित्रपट आपल्या आवडीचा असेल.
हे मन खूप चंचल असते, कधी या तर कधी त्या फुलावर बसणार्या भुंग्यासारखे असते. जर वेळीच ते नियंत्रणा खाली नाही आणले की तुमचा मनावरचा ताबा सुटतो आणि युध्धात उध्वस्त झालेल्या विमानाप्रमाणे तुम्ही आयुष्यात हेलकावे खाउ लागतात.आणि तशा स्तिथीत जस विमानवर ताबा मिळवणे कठीण होऊन जाते तशीच अवस्था मग अस्थिर मनाला स्थिर करताना होते.
तुम्ही घाबरून जाउ नका, कधी कधी हेच हेलकावे खाणारे विमान तुम्हाला जगाच्या एका टोका पासून दुसर्या टोका पर्यंत सेकॅंडाच्या एक शतांश वेळेमधे पोहचवू शकते. असा तुफान वेग असतो मनाचा. संभाळून हां...नाहीतर अपघात व्हायचा..:) असा वेग अजुन सूर्याच्या किरणांना पण गाठता आला नाही आहे कारण रात्री नंतर पहाटे पहाटे पहिल्या सूर्या किरणानी भुमी न्हाहून निघायला तब्बल काही तासांचा अवधी लागतो. पण मनाच काय तुम्ही आता ठरवल की रात्र होते आणि तुम्ही ठरवल की दिवस पण !!!!
तुमच सगळ आयुष्य तुमच्या मनावर अवलंबुन असत. समजा वाळवंटाच्या एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत निघालेल्या दोन प्रवाश्यांपैकी एक मनाने खूप दुर्बळ आहे. वारंवार फसवणार्या म्रुगजळामुळे खूप हताश झालेला आहे आणि दुसरा त्या म्रुगजळाचा पाठलाग करून सुद्धा हरला नाही आहे. सहाजिकच पहिला प्रवासी वाटेतच दगावणार. कारण हे नाही आहे की तो शरिराने थकला होता की त्याला पुरेसे पाणी मिळाले नाही. कारण हे आहे की त्याच्या मनाने प्रतिकूल परिस्तिथित पराभव स्वीकारला होता.मात्र दुसरा प्रवासी भर वादळात सुद्धा वाळवंटाच्या दुसर्या टोकाला पोहोचतो आणि तेही पाण्याचा एक थेंब ही न पिता.
उत्तर तुमच्या समोर आहे.तुम्हीच आता विचार करा ???? तुमच्या बेंभान, मोकाट सुटलेल्या मनाला तुमच्या अधिपत्याखाली आणा.तुम्ही मनाच्या अधिपत्याखाली जाउ नका नाही तर तुमच परिपत्य नक्की आहे.
किती फरक पडतो ना माणसांत
लहानपणि खेळणी तूटल्यावर रडनार पोर
मोठेपणी स्वप्ने तूटल्यावर सुध्धा
हसत हसत वावरत
:- अजय कोरपे
तू आल्यापासून सध्या
स्वप्नांच्या दुनियेत वावरतोय
खोट का बोलाव तुझ्याशी...
वेड्यांसारख मधेच खुदकन हसतोय
:- अजय कोरपे
कधी कधी हा एकटेपणा
खूप काही सांगून जातो
जस काळ्या गर्द अंधाराला
मिणमिणता दिवा निरोप सांगून जातो
:- अजय कोरपे
मैत्री ही गुलाबाच्या
काट्यासारखी असते
त्यांची कितीही निर्भत्सना केली
तरी फुलाला तेच सांभाळत असते
:- अजय कोरपे
तुझ्या दबक्या पावलाचा मागोवा
वेड मन घेत असत
तू कायम माझ्या सोबत आहेस
असाच भास करून देत असत
:- अजय कोरपे
बस एक दुखन सोडून
सगळ काही घेऊन गेलीस
कोण किती विव्हळ्त आहे
न पुसता निघून गेलीस
: - अजय कोरपे
काही शब्दच अपुरे पडत होते
भावना व्यक्त करण्यासाठी
तुझा हात हाती घेऊन
समुद्रा काठी फिरण्यासाठी
: - अजय कोरपे
पिल्लांच्या पोटासाठी
चिमना घरट्याबाहेर पडला
त्यांची पोट तर भरली
पण त्यांच्या चिवचिवाटाला मुकला
:- अजय कोरपे
तू दूर जाताना सुद्धा तुझी सावली
तुझी राहिली नव्हती
नाहीतर माझ बोट सोडून, ती नक्की
तुझ्या सोबत आली असती
:- अजय कोरपे